समाजात ज्या लोकांना वाटते की आपल्या समाजात गरीब, वंचित, शोषित यांच्यासाठी आवाज उठवणारा कोणी तरी असावा. आणि जेव्हा प्रत्यक्षात एखादा तरुण वा धाडसी व्यक्ती पुढे येऊन अन्याया विरुद्ध उभा राहतो, तेव्हा समाजाची काळजी असणारे व समाजात सुशिक्षित, जबाबदार मानले जाणारे लोक त्याच्या मागे ठाम उभे राहतात.
अनेक वेळेला सत्तेची समज नसणारे व पदाचे महत्व न जाणणारे लोक व त्याचा बरोबर अनेक वर्ष ऐनकेन प्रकारे सत्ता हातात ठेवलेले लोकं त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. कारण काहींना वाटते की संघर्ष धोकादायक आहे, त्यातून स्वतःला किंवा कुटुंबाला त्रास होईल. अशा वेळी त्याला पैसा जाईल, हे आपलं काम नाही, तू करतोस पण लोक पाठीशी उभे राहणार नाही, कोणी कोणाचं नाही अशी कारणे दाखवून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो व दुसरी कडून ३०/४० वर्षाची तीच जुनाट भूरसट व्यवस्था टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. या व्यवस्थेत कोणातरी नेत्यावर अवलंबून राहत व आपला मतदार नाराज होणार नाही याची काळजी घेऊन वेळप्रसंगी त्यांचे सर्व गुन्हे माफ करून अशी बुडती सत्ता तारुन ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि यातूनच निर्माण होते घराणेशाही ही एकदा निर्माण झाली कि, त्या घराण्याला सत्ता सोडवत नाही. आता गरीबाच्या आणि सर्व सामान्यांच्या अडीअडचणीला किंमत राहत नाही. योग्य निर्णय घेण्याचे सहासच अंगात नसल्याने गरजू व लाभार्थी व्यक्तीला जाणीव पूर्वक त्या लाभा पासून वंचित ठेवण्यात येते. मतदानाच्या वेळी पुन्हा या सर्व सामान्य जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो व अनेक वेळा असे प्रयोग यशस्वी देखील होतात. परंतु सुशिक्षित तरुण या सर्व बाबींवर बारीक नजर ठेऊन असतो व तो त्याच्या पैकी एक नेतृत्व पुढे आणत असतो. आता पुढे आलेले नेतृत्व आपल्याला मिळालेल्या अगदी तुटपुंज्या व अधिकार हीन सत्ते मध्ये देखील आपली एक छाप सोडण्यात यशस्वी होतो. कारण तो सत्तेच्या मुख्य प्रवाहात नसला तरी तो त्याच्या शब्दाला तलवार बनवून समाजातील अन्यायावर कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या प्रस्थापित सत्ते सोबत मग ती सत्ता दादागिरी ची असो, प्रशासनाची असो, किंवा राजकीय असो तो त्याविरुद्ध लढण्याची क्षमता ठेवतो. त्याने आपल्या विशिष्ट कार्यशैलीतून जनमानसात त्याचे स्वतःचे एक व्यक्तिमत्व निर्माण केलेले असते. अशा वेळी त्याला वाटणे साहजिक आहे कि, आता मुख्य सत्ता आपल्या हाती आली पाहिजे ती आली तर ज्या गोष्टी आपण तुटपुंज्या सत्तेत पदहीन असतांना केल्या त्या आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो कारण काळानुरूप समाजातील प्रश्न कार्य करण्याच्या बदलेल्या पद्धती त्याने शिकून घेतलेल्या असतात. आता जुनी व्यवस्था आणि नवीन नेतृत्व यात एक जोरदार संघर्ष होऊन जुनी व्यवस्था कायमची जाऊन नवीन नेतृत्व जे जनतेतून आले आहे ते उदयास येण्यास सुरुवात होते. त्याची सुरुवात होताना आता सत्तेला देखील प्रश्न विचारायची हिम्मत त्याच्यात आलेली असते कारण, त्याला मागील अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली आहे कि, मागील अनेक वर्ष नेत्यांच्या मागे आपले लोक फिरले त्या नेत्याला ते कधीच प्रश्न विचारू शकले नाही व आपल्या हक्काची वाजवी मागणी देखील ते करू शकले नाही, मनुष्य प्राणी असल्याचा पायाभूत गुणधर्म म्हणजे रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही हा साधा नियम देखील ते विसरले होते. हा सर्व मागील अनुभव लक्षात घेऊन हा नव तरुण आता सत्तेला प्रश्न विचारायला सज्ज होतो. अनेक लोकांच्या मनातील प्रश्न असल्याने तो त्या जनतेचा आवाज बनून सत्तेशी टकरा घेण्याचे धाडस दाखवतो अशा वेळी त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे ही एक कमप्राप्त बाब आहे. परंतु त्याने देखील आता कोणत्याही दबावाला न झुकण्याचा पवित्रा घेतला आहे. व समाजातील पिढीत लोकं व असे लोकं ज्यांना गरीबाची कणव आहे व अन्यायाची जाणीव आहे ते त्याच्या पाठीशी ठाम राहण्याची हिम्मत करतात आणि.......... भाग 2 लवकरच.
-जयदिप गवाळे-
लेखक ग्रामपंचायतीचे विध्यमान सदस्य आहेत.
