सोमवार, २९ जुलै, २०२४

सेक्युलर आता शांत का ?

अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे. तर विद्या किर्तीशाही ही बौद्ध समाजाची… या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. पण आपल्या समाजात जाती व्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत. याच जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली. अमितच्या हत्येने अनेक सवाल निर्माण झालेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्था नाकारली. त्यांच्या विचारांना मानणाऱ्या, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांनी जातीभेदामुळे आपल्याच मुलीच्या पतीची हत्या करावी? आपली जात आपल्याच मुलीच्या सुखाच्या आड यावी? व या सर्व प्रकरणावर सेक्युलर किड्यांनी मुग गिळून शांत राहावे हे विशेष आहे.




सदर प्रकरणात मुलीच्या दलीत बापाकडून व भावाकडून अमितची हत्या केली गेली आहे. परंतु हीच हत्या एखाद्या सवर्णा कडून झाली असती तर एव्हाना महाराष्ट्र पेटला असता किंवा जाणीवपूर्वक पेटवला गेला असता. स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारया बेगडी पत्रकारांनी व नेत्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने केली असती परंतु आता सर्व शांत आहेत. आंबेडकरी विचार तोंडाने बोलणे वेगळे व प्रतक्ष जगणे वेगळे. संवेदनशीलता या शब्दाचा अर्थ सांगताना एकेठिकाणी बाबासाहेब सांगतात संवेदनशीलता ती नाही जी जातीनिहाय किंवा विचार निहाय येते एखाद्या चुकीच्या घटनेचा बळी तुमचा शत्रू जरी झाला तरी त्या बद्दलची संवेदना जागरूक होणे हीच खरी संवेदनशीलता. उदा. एखाद्या माणसावर अन्याय झाल्या नंतर ती व्यक्ती आपल्या विचार धारेची आहे किंवा आपल्या जातीची आहे हे कळल्यानंतर जर तुम्हाला दुख होत असेल तर ती संवेदनशीलता बेगडी आहे खोटी आहे. 

     अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जगाचा, जाती-पातीचा विचार न करता दोघं प्रेमविवाह करतात. पण सुखी संसाराला सुरुवात होताच त्यांची सुखी संसराची स्वप्न धुळीस मिळवली जातात. कारण मुलीच्या घरचे तिच्या पतीची हत्या करतात.भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित नामक तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघे एकत्र वाढले. पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केलं. मुलीच्या घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून पुन्हा अमित व विद्याने बौद्ध पद्धतीने पुन्हा लग्न केलं. लग्नाला एक महिना होतो न होतो तोच अमित साळुंखेची हत्या केली गेली.

संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी त्याला घराबाहेर बोलावून घेतलं. अमित हातात मोबाईल घेत घराबाहेर गेला. घराजवळच्या झालाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रक्ताने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडे पोटाच्या बाहेर आले. अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिलं तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. १४ जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केली आहे.

घटना विरोधी बाजूने घडली असतीतर एव्हाना संसदेत देखील याचे पडसाद उमटले असते परंतु जातीवादाची एकतर्फी पट्टी बांधलेले सेक्युलर आता शांत का ? हीच खरी शोकांतिका. 





   -जयदिप गवाळे-



गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

कान्हार्ले येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

    श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पालखी मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम, भजने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गावातील मंदिरांमध्ये मंगळवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर भजनाचा कार्यक्रम भाविकांच्या साक्षीने रंगला.



     हनुमान जयंतीनिमित्त गावातील मारुती मंदिर रोषणाईने व पताक्याने सजविण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. यावर्षी श्री. भूषण सखाराम कंटे यांच्या वतीने मारुतीच्या मूर्तीला रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे गावातील तमाम तरुणांमध्ये उत्साह संचारला होता हा उत्साह हेरून गावातील तरुण ह.भ.प कु. संतोष यशवंत कंटे उर्फ बाळाबुवा याच्या पुढाकाराने या वर्षी गावात भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सायंकाळी ठीक ७.३० वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली पालखी हनुमान मंदिर येथून आई भवानी मंदिरा कडे नेण्यात आली तदनंतर संपूर्ण गावात पालखी फिरविण्यात आली यावेळी शेकोडोच्या संख्येने भाविक हजर होते. पालखी पुढे भजनी मंडळी भजन करत होते. तर पालखी मागे महिला उपस्थित होत्या. भजनाचा संपूर्ण भार ह.भ.प कु. संतोष यशवंत कंटे उर्फ बाळाबुवा याने उचलला होता तर गावातील तमाम तरुण त्याला साथ देत होते. परंतु प्रमुख साथ दिली ती जिल्ह्यातील नामवंत तबला वादक कान्हार्लेची शान व कान्हार्ले करांचा अभिमान असलेल्या प्रसिद्ध तबला वादक श्री.अरुण गोविंद घावट याने. गावात पालखी फिरल्या नंतर मारुतीच्या मंदिरात महाआरती घेण्यात आली यावेळी तमाम तरुणांचा सहभाग व उत्साह पाहण्या जोगा होता. या नंतर रात्री उशिरा भजनाला सुरुवात झाली बांधीवली येथून आलेल्या ह.भ.प श्री. काळूराम महाराज घागस यांच्या पहाडी आवाजाने संपूर्ण कान्हार्ले गाव दुमदुमून उठले या वेळी देखील गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री २.०० वाजेपर्यंत भजन चालून देखील लोकांच्या उत्साहात तसूभर देखील कमतरता आढळली नाही. भजनाचा कार्यक्रम संपल्या नंतर लक्की ड्रो चा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिक्सर कु.तुषार सीताराम गवाळे याने जिंकले, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कुकर सौ.गीता दिलीप कंटे यांनी जिंकले तर तिसऱ्या क्रमांकाची इस्त्री श्री. स्वप्नील सुरेश गवाळे याने जिंकले हि बक्षिसे अनुक्रमे सुभाष कंटे, प्रकाश हंडोरे व अरुण घावट या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. गावचे उपसरपंच श्री.जयदीप (भाई) गवाळे यांनी उपस्थितांचे व आलेल्या पाहुण्यांचे व गावातील सर्व तरुणांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.










खर्चाचा अहवाल बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1WyLi433oPL4uaZfEKKxCJNFj3wCg-0WR/view?usp=drivesdk


देणगीदार बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1_PbJaOEC3HTDePVeWP5HwUAO1gAgtjsy/view?usp=drivesdk


   -जयदिप गवाळे-







शनिवार, १३ एप्रिल, २०२४

जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी सुरू केली बाबासाहेबांची जयंती

बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.






जुन्या काळातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांचा जन्म सासवड येथे २४ ऑगस्ट १८९८ मध्ये झाला. ज्या काळात शिक्षणाच्या सोयी वा सवलती उपलब्ध नव्हत्या त्या काळात पुणे जिल्ह्यातील दलित समाजातील ते पहिले म्यॅट्रिक झाले यातच त्यांचा मोठेपणा आहे. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दोन वर्षे अभ्यास केला. १९१८ ते  १९२१ साली त्यांनी सन्मार्ग दर्शक मंडळाची स्थापना करून सामाजिक सभा, संमेलने व्याख्याने नाटके प्रौढांकरता रात्रीचे वर्ग चालवले. सोबतच व्यायामशाळा काढून तरूण सुशिक्षितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

महार सेवादलाची त्यांनी स्थापना केली. तिचे ते कमांडर इन चीफ बनले. राजकारण त्यांनी जास्त केले नाही परंतु सामाजिक कार्याचे ते चाहते होते. समाजकार्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र तीन हजार रुपये प्रेस फंड पाच हजार रुपये इमारत फंड जमवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुण्यात युवक परिषद भरवली गेली ती पुणे जिल्ह्यासाठी किंवा शहरासाठी नव्हती. त्यात संबंध महाराष्ट्रातील प्रतिनिधी आले होते. १९३९ साली कायदे मंडळात चौदाही प्रतिनिधी निवडून गेले. त्याचे श्रेय बाऊसाहेब रणपिसे यांचेकडे ओघानेच जाते.

महात्मा गांधी यांनी पुण्यात उपवास केला त्यावेळी बाबासाहेबांचा मुक्काम नॅशनल हॉटेसमध्ये होता. त्यावेळी रणपिसे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विशेष म्हणजे ते त्यावेळी सरकारी नोकरी करत होते. अशा रीतीने ते एक समाजसेवाच करत होते.

पहिली जयंती

डॉ. बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम १४ एप्रिल १९२८ रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या.

या नंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. २४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.


       -जयदिप गवाळे-

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

कान्हार्ले येथे शिवजन्मोस्तव २०२४ मोठ्या उत्साहात साजरा अवघे वातावरण झाले शिवमय

ठिकाण कान्हार्ले - आकर्षक सजलेले कान्हार्ले गाव... डीजेच्या तालावर थिरकणारी तरुण तरुणींची पाऊले आणि महिलांची फुगडी... परंपारिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध...शिवाजी महाराजांची पालखी...शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि गाणी 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय'  असा जयघोष...  अशा 'शिवमय' वातावरणात  शिवरायानां मानवंदना देण्यात आली.


निमित्त होते, ग्रामस्थमंडळ कान्हार्ले यांच्यातर्फे आयोजित शिवजन्मोस्तव २०२४ या सोहळ्याचे. हनुमान मंदिर येथील मारुतीरायाच्या मूर्तीचे पूजन करून व शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी गावातील तमाम शिवप्रेमी तरुण तरुणी तसेच आबालवृद्ध उपस्थित होते. शिवजयंतीचे यंदाचे ८ वे वर्ष होते. पालखीचे स्वागत व दर्शन घेण्यासाठी व पालखीला ओवाळण्यासाठी आया बहिणी दारोदारी उभ्या होत्या. पुढे चालणारा डीजे व डीजेच्या तालावर थिरकणारी तरुण तरुणींची पाऊले मागे असणारी पालखी व पालखीचे दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या महिला त्यात काही तरुण तर काही अगदी वयोवृद्ध पण दोघींमधील उत्साह मात्र सारखा तरुण तरुणींना नाचतांना पाहून या महिलांनीहि फुगडी घालायला सुरुवात केली आणि अवघे वातावरण आनंदीमय झाले. डीजेची व्यवस्था असल्याने इच्छा असतांनाहि संपूर्ण गावात पालखी फिरवता आली नाही. तरी देखील गावातील तमाम मंडळी पालखी सोहळ्यास हजर होती. गावात हळद असल्याने वेळेची मर्यादा लक्षात घेऊन पालखी शक्य तिथे फिरवून पालखी 'आई भवानी देवीच्या मंदिराकडे' निघाली यावेळी मोठा जनसमुदाय हरज होता. 


     मिरवणुकीच्या कार्यक्रमानंतर ठीक रात्री ९.३० मिनिटांनी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी गावातील अनेक लहानग्यांनी भाषणे, नृत्य, व गायन करून उपस्थितांची मने जिंकली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुनावातांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. गावातील निराधार व्यक्तींचा आधार होऊन अनेक लोकांना शासनाच्या विविध योजना मिळवून देणाऱ्या 'श्री. संजय काळुराम गवाळे' यांचा सत्कार करण्यात आला, गावातील पहिली CA झाल्याचा मान मिळवल्या बद्दल 'कुमारी. शिवानी रमेश गवाळे' हिचा सत्कार करण्यात आला, गावातील पहिली पोलीस होण्याचा मान मिळवल्या बद्दल 'कुमारी. रचना रघुनाथ पष्टे' हिचा सत्कार करण्यात आला, प्रतिकूल परीस्थीवर मात करून BMC शिक्षक परीक्षा पास केल्या बद्दल 'कुमार. महेंद्र अशोक कंटे' याचा सत्कार करण्यात आला, आंतरशालेय जिल्हा वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्या बद्दल 'कु.वेद विलास कंटे' याचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील तरुणांच्या वतीने एक विशेष सत्कार करण्यात आला. गावातील हनुमान मंदिरातील मारुतीरायाच्या मूर्तीला अनेक वर्ष रंगरंगोटी करण्यात आली नव्हती हि बाब हेरून श्री. भूषण सखाराम कंटे यांनी अतिशय कलात्मक रित्या मारुतीरायाच्या मूर्तीला रंगरंगोटी केल्या बद्दल गावातील तमाम तरुणांनी श्री.भूषण सखाराम कंटे यांचा सत्कार केला. 


     यावेळी गावात एकी व्हावी, गावातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रसंगात आपल्या मातीचा माणूस म्हणून सर्व गावकऱ्यांनी त्याच्या पाठीशी ठाम उभे राहावे. गावातील कोणत्याही व्यक्तीला जात, पात, धर्म, लिंग, पक्ष, संघटना, आचार, विचार या चष्म्यातून न पाहता आपल्या गावातील आपल्या मातीतील माणूस या भावनेतून त्याच्या प्रत्येक प्रसंगात उभे राहण्याचा संदेश गावचे उपसरपंच जयदिप गवाळे यांनी दिला.

     सरते शेवटी महिलांच्या व तरुणींच्या संगीत खुर्चीची स्पर्धा झाली यावेळी महिला गटातून प्रथम क्रमांक पटकावून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवण्याचा मान 'सौ. मीना नामदेव कंटे' यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक पटकावून द्वितीय पारितोषिक 'सौ. सुधा सुरेश गवाळे' यांना मिळाला. तरुणींच्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवण्याचा मान 'कुमारी. दर्शना भास्कर गवाळे' यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक पटकावून द्वितीय पारितोषिक 'कुमारी. रश्मी चंद्रकांत गवाळे यांना मिळाले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तमाम तरुण-तरुणी, जेष्ठ-श्रेष्ठ मंडळींची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत लाभली त्यासर्वांचे मनोमन आभार मानून व चुकभुलीची क्षमा मागून ९ व्या वर्षात पुन्हा मोठ्या जल्लोषात कार्यक्रम करू हे आश्वासन देऊन ८ वा "शिवजन्मोस्तव २०२४" हा कार्यक्रम पार पडला.










 
बॅलन्स शीट बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1ZdnL49Lm48opKKsMXi57tVTvl3nevJE_/view?usp=drivesdk

देणगीदार बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1ZTsoOK3UQ-ypy6APSg9VvzYZfh5ytxkA/view?usp=drivesdk

     -जयदिप गवाळे-





'इडा पिडा टळू दे ! बळीचे राज्य येउदे '

 बळी राजाला काळजांच्या आत जपून ठेवावा , असा निरागस ' माणूस ' ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात व...