श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पालखी मिरवणूक, धार्मिक कार्यक्रम, भजने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून गावातील मंदिरांमध्ये मंगळवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर भजनाचा कार्यक्रम भाविकांच्या साक्षीने रंगला.
हनुमान जयंतीनिमित्त गावातील मारुती मंदिर रोषणाईने व पताक्याने सजविण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. यावर्षी श्री. भूषण सखाराम कंटे यांच्या वतीने मारुतीच्या मूर्तीला रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे गावातील तमाम तरुणांमध्ये उत्साह संचारला होता हा उत्साह हेरून गावातील तरुण ह.भ.प कु. संतोष यशवंत कंटे उर्फ बाळाबुवा याच्या पुढाकाराने या वर्षी गावात भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सायंकाळी ठीक ७.३० वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली पालखी हनुमान मंदिर येथून आई भवानी मंदिरा कडे नेण्यात आली तदनंतर संपूर्ण गावात पालखी फिरविण्यात आली यावेळी शेकोडोच्या संख्येने भाविक हजर होते. पालखी पुढे भजनी मंडळी भजन करत होते. तर पालखी मागे महिला उपस्थित होत्या. भजनाचा संपूर्ण भार ह.भ.प कु. संतोष यशवंत कंटे उर्फ बाळाबुवा याने उचलला होता तर गावातील तमाम तरुण त्याला साथ देत होते. परंतु प्रमुख साथ दिली ती जिल्ह्यातील नामवंत तबला वादक कान्हार्लेची शान व कान्हार्ले करांचा अभिमान असलेल्या प्रसिद्ध तबला वादक श्री.अरुण गोविंद घावट याने. गावात पालखी फिरल्या नंतर मारुतीच्या मंदिरात महाआरती घेण्यात आली यावेळी तमाम तरुणांचा सहभाग व उत्साह पाहण्या जोगा होता. या नंतर रात्री उशिरा भजनाला सुरुवात झाली बांधीवली येथून आलेल्या ह.भ.प श्री. काळूराम महाराज घागस यांच्या पहाडी आवाजाने संपूर्ण कान्हार्ले गाव दुमदुमून उठले या वेळी देखील गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री २.०० वाजेपर्यंत भजन चालून देखील लोकांच्या उत्साहात तसूभर देखील कमतरता आढळली नाही. भजनाचा कार्यक्रम संपल्या नंतर लक्की ड्रो चा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिक्सर कु.तुषार सीताराम गवाळे याने जिंकले, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कुकर सौ.गीता दिलीप कंटे यांनी जिंकले तर तिसऱ्या क्रमांकाची इस्त्री श्री. स्वप्नील सुरेश गवाळे याने जिंकले हि बक्षिसे अनुक्रमे सुभाष कंटे, प्रकाश हंडोरे व अरुण घावट या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. गावचे उपसरपंच श्री.जयदीप (भाई) गवाळे यांनी उपस्थितांचे व आलेल्या पाहुण्यांचे व गावातील सर्व तरुणांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
खर्चाचा अहवाल बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1WyLi433oPL4uaZfEKKxCJNFj3wCg-0WR/view?usp=drivesdk
देणगीदार बघण्यासाठी येथे क्लिक करा -https://drive.google.com/file/d/1_PbJaOEC3HTDePVeWP5HwUAO1gAgtjsy/view?usp=drivesdk
-जयदिप गवाळे-







.jpeg)







