बळी राजाला काळजांच्या आत जपून ठेवावा , असा निरागस ' माणूस ' ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला कष्टाचे व हक्काचे फळ सम प्रमाणात विभागून देणारा हा नेता ! भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या भारतीय जनसमाजाचा महानायक , एक महासम्राट , एक महान तत्त्ववेत्ता !
अशा आपल्या महान बळीराजाचा वामनाने कपटाने घात केला . पण आज बळीराजा जीवंत आहे . शेतकऱ्याची आई माऊली आजही
'इडा पिडा टळू दे ! बळीचे राज्य येउदे ' असे म्हणून हजारो वर्षांपासून स्मरण आजही करते. अशा आपल्या महापराक्रमी सर्वगुणसंपन्न , समतावादी शेतकऱ्याच्या कुणबी राजाची दिवाळीत घराघरामध्ये पूजा व्हावी आणि आपली मूळ संस्कृती उजळावी ही इच्छा.
"बळी प्रतिपदेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा"
धन्यवाद!
जयदिप गवाळे
