ठिकाण कान्हार्ले - आकर्षक सजलेले कान्हार्ले गाव... ढोल टाशाच्या तालावर थिरकणारी तरुण तरुणींची पाऊले आणि महिलांची फुगडी... परंपारिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध...शिवाजी महाराजांची पालखी...शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि गाणी 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय' असा जयघोष... अशा 'शिवमय' वातावरणात शिवरायानां मानवंदना देण्यात आली.
मिरवणुकीच्या कार्यक्रमानंतर ठीक रात्री ९.३० मिनिटांनी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी गावातील अनेक लहानग्यांनी भाषणे, नृत्य, व गायन करून उपस्थितांची मने जिंकली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंतांचे सन्मान व सत्कार करण्यात आले.
बॅलन्स शीट बघण्यासाठी येथे क्लिक करा - जमा खर्च अहवाल
देणगीदार बघण्यासाठी येथे क्लिक करा - सन्माननीय देणगीदार

