रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

कामगार, शेतकरी व विद्यार्थ्यांची करुण कहाणी

राजकारणात वापरला जाणारा पैसा, श्रीमंतांचा राजकीय प्रवेश त्यातून होणारे अनैतिक व्यवहार व व्यवहारात नागवला जाणारा सर्व सामान्य माणूस यामुळे निर्माण झालेली भयानक असमानता आणि जबरदस्तीने लादलेला भेदभाव देशातील गावागावांना एका मोठ्या उलथापालथीकडे घेऊन जात आहे. हे सत्य आहे की ही स्थिती फार दिवस टिकू शकत नाही. स्पष्ट आहे की आजचा धनिक समाज एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून रंगरेल्‍या करत आहे आणि शोषकांचे निष्पाप लेकरं व कोट्यवधी शोषित लोक एका भयंकर दरीच्या कड्यावरून आज चालत आहेत.
समाजाचा प्रमुख घटक असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक अधिकारांपासून, विध्यार्थी वर्गाला चांगल्या व परवडणाऱ्या शिक्षणा पासून व शेताकऱ्यांना त्यांच्या अधिकारा पासून वंचित ठेवले जात आहे आणि त्यांच्या वाटेचे सगळे धन शोषक भांडवलदार वर्ग व त्यांची चाटू गिरी करणारे राजकीय नेते लाटून नेतात. दुसऱ्यांना अन्नदाता असलेले शेतकरी आज आपल्या परिवारासह दाण्या-दाण्यासाठी मोहताज झाले आहेत. याउलट समाजावरचे शोषक लोक क्षुल्लक कारणांसाठी लाखोंचा व्यवहार चुटकीसरशी उडवतात.

समाजातील लोकांना त्यांच्यावर होणारा अन्याय कळू नये कामगारांनी वाढलेल्या कामावर कामाच्या तासांवर बोलू नये आंदोलन करू नये, विध्यार्थी वर्गाने परवडणाऱ्या शिक्षणासाठी रस्त्यावर उतरू नये व शेतकऱ्यांने शेती संधर्भात आवाज उचलू नये म्हणून सर्वत्र जाती जाती मध्ये वाद लावून दिले जात आहे व मूळ समस्यांपासून व मूळ आंदोलना पासून  त्यांना दूर ठेवले जात आहे.

नवतरुण वर्गाने आपले खरे शत्रू कोण हे ओळखायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच या व्यवस्थेचा चकणाचूर होणार आहे. परंतु यासाठी नातेसंबंधांचे व पैसा आधारित राजकारण संपवून सत्य बाजू परखड पणे मांडणारे व गरीबाच्या न्याय हक्कासाठी लाठ्याकाठ्या झेलण्यास मागे न हटणारे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे.



-जयदिप गवाळे-

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकच्या भ्रष्ट व्यवस्थेला उलथवण्यासाठी Gen Z सारख्या आंदोलनाची गरज

बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि तरुणाईची संघर्षयात्रा 

    अहिंसक आंदोलनांची गरज प्रत्येक लोकशाही व्यवस्थेत असते. परंतु आज बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त झालेल्या तरुणांना संयमाने आवरणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. रोजगाराच्या संधींचा अभाव, वैयक्तिक आयुष्यातील असुरक्षितता, त्यातून निर्माण होणारे नैराश्य, व्यसनाधीनता,   अविवाहीतता या सर्वांचा थेट परिणाम तरुणांच्या जीवनावर होत आहे. यामुळे पालकही मानसिक व आर्थिक दृष्ट्या कोलमडून जात आहेत. धर्मांधता व जातीयता एका विशिष्ट मर्यादेपलीकडे बेरोजगारी व भ्रष्टाचारामुळे निर्माण झालेल्या आगीला रोखू शकणार नाहीत. आजचा तरुण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवत आहे आणि आवश्यक तेव्हा रक्त सांडायलाही मागे हटत नाही. हेच क्रांतीचे लक्षण आहे. शेजारील देश नेपाळमध्ये तरुणांनी Gen Z आंदोलनांच्या माध्यमातून सत्तांतर घडवून आणले आहे. यावरून स्पष्ट होते की तरुणाई मध्ये व्यवस्था बदलण्याइतकी ताकद आहे.

गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये चालू असलेली राजकीय अस्थिरता, आर्थिक तंगी, वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, भ्रष्टाचार व नेत्यांची अश्लील ऐशआरामशाही यामुळे तिथल्या सामान्य लोकांमध्ये व युवकांमध्ये प्रचंड संताप साचत होता, जो सोशल मीडियावर प्रखर चर्चेचा विषय होता. या आंदोलनापूर्वीच सोशल मीडियावर #nepokids आणि #Nepobaby हे टॅग्स असलेले पोस्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते, ज्यात नेपाळचे युवक नेत्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांच्या लेकरांच्या ऐशआरामी जीवनाचा पर्दाफाश करत होते. ओली सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीने या आधीच पेटलेल्या जनआक्रोशाच्या आगीत तेल ओतल्यासारखे झाले.

नेपाळमधील युवकांचे हे बंड केवळ सत्ताधारी सुधारणावादी पक्ष किंवा त्याच्या नेत्यांविरुद्धच नाही, तर गेल्या दोन दशकांत सत्तेत सहभागी झालेल्या किंवा सत्तेजवळ असलेल्या सर्वच पक्ष व नेते आणि धनिकांविरुद्ध आहे. त्यामुळेच आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर संसद, पंतप्रधान निवास, राष्ट्रपती निवास, प्रशासकीय मुख्यालय, सर्वोच्च न्यायालय तसेच सर्व मोठ्या पक्षांची कार्यालये व त्यांच्या नेत्यांची घरे होती.

भारतात देखील परिस्थिती वेगळी नाही म्हणूनच गावोगावी अहिंसक आंदोलनांची चळवळ उभारणे ही काळाची गरज आहे. रोजगार
, शिक्षण, आरोग्यसेवा यातील व्यापारीकरण तसेच सर्व स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार या सर्वांविरुद्ध तरुणाईत वाढत चाललेली उदासीनता जर आंदोलनात परिवर्तित झाली. तर भ्रष्ट व्यवस्थेला ठिकाणावर आणता येईल.

लोकशाहीतील प्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा ही जनतेची सेवक असूनही प्रत्यक्षात नागरिकांना गुलामासारखी वागणूक दिली जाते ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाचे बाजारीकरण, पदव्यांची विक्री, व संधीसमानतेचा अभाव यामुळे तरुणाईत प्रचंड असंतोष वाढत आहे.

MIDC मधील कामगारांची अवस्था, शेती क्षेत्रातील उदासीनता, नोकऱ्यांमधील व्यपारीकरण, वाढता खर्च व त्यामागून येणारा कर्जाचा डोंगर याला जबाबदार भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचाराचे नमुनेदार उदाहरण म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भरतीतील घोटाळे. पैशाच्या जोरावर २५ ते ३० लाख रुपयांच्या बोलीवर नोकऱ्यांचे वाटप होत असल्याच्या घटना उघडपणाने दिसत आहेत. परीक्षा पारदर्शक पद्धतीने न घेता, फक्त पैशाच्या बळावर निवड केली जाते. परिणामी, श्रीमंतांची मुले नोकरीला लागतात तर गरीब पालक आपल्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून घर, जमीन, सोने विकून अथवा गहाण ठेवून प्रयत्न करत राहतात. एवढेच नव्हे तर, बँकेशी काहीही संबंध नसलेल्या टोळ्याही नोकरीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. या गंभीर विषयावर ठाणे जिल्ह्यातील कुठलाही नेता आजवर ठामपणे उभा राहिलेला नाही व राहणार देखील नाही कारण त्यांचे आर्थिक हितसमंध यात नेहमीच असतात. आपण ज्यांना आपले नेते किंवा दैवत मानतो तेच आपल्या मुलाबाळांच्या भविष्याशी खेळत असूनही आपण शांत राहतो हे अधिक चिंताजनक आहे.

आज बँक व्यवस्थापनाशी संलग्न पॅनेलांना पाठिंबा देणाऱ्या, कार्यकर्त्यांची स्वतःची मुलेसुद्धा बेरोजगार आहेत. त्यामुळे या लढ्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. जर ठाणे जिल्ह्यातील शोषित तरुणांनी या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एकजुटीने संघर्ष केला नाही, तर भविष्यात खरी पात्रता व गुणवत्ता यांना कोणतेही महत्त्व उरणार नाही. “पैशाच्या जोरावर सत्ता आणि सत्तेच्या जोरावर पैसा” हा खेळ जसा आज सुरू आहे, तसाच उद्याही चालू राहील. पण प्रश्न हा आहे तरुण या गंभीर प्रश्नांकडे गांभीर्याने बघेल का? 

  

-जयदिप गवाळे-



गुरुवार, ६ मार्च, २०२५

कान्हार्ले येथे शिवजन्मोस्तव वर्ष ९ वे २०२५ मोठ्या उत्साहात साजरे

 ठिकाण कान्हार्ले - आकर्षक सजलेले कान्हार्ले गाव... ढोल टाशाच्या  तालावर थिरकणारी तरुण तरुणींची पाऊले आणि महिलांची फुगडी... परंपारिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध...शिवाजी महाराजांची पालखी...शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषणे आणि गाणी 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज कि जय'  असा जयघोष...  अशा 'शिवमय' वातावरणात  शिवरायानां मानवंदना देण्यात आली.



निमित्त होते, ग्रामस्थमंडळ कान्हार्ले यांच्यातर्फे आयोजित शिवजन्मोस्तव २०२५ या सोहळ्याचे. हनुमान मंदिर येथील मारुतीरायाच्या मूर्तीचे पूजन करून व शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या प्रसंगी गावातील तमाम शिवप्रेमी तरुण तरुणी तसेच आबालवृद्ध उपस्थित होते. शिवजयंतीचे यंदाचे ९ वे वर्ष होते. पालखीचे स्वागत व दर्शन घेण्यासाठी व पालखीला ओवाळण्यासाठी आया बहिणी दारोदारी उभ्या होत्या. ढोल  टाशाच्या तालावर थिरकणारी तरुण तरुणींची पाऊले मागे असणारी पालखी व पालखीचे दर्शन घेऊन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या महिला त्यात काही तरुण तर काही अगदी वयोवृद्ध पण दोघींमधील उत्साह मात्र सारखा तरुण तरुणींना नाचतांना पाहून या महिलांनीहि फुगडी घालायला सुरुवात केली आणि अवघे वातावरण आनंदीमय झाले. इच्छा असतांनाहि वेळे अभावी संपूर्ण गावात पालखी फिरवता आली नाही. तरी देखील गावातील तमाम मंडळी पालखी सोहळ्यास हजर होती.
    मिरवणुकीच्या कार्यक्रमानंतर ठीक रात्री ९.३० मिनिटांनी मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी गावातील अनेक लहानग्यांनी भाषणे, नृत्य, व गायन करून उपस्थितांची मने जिंकली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुणवंतांचे सन्मान व सत्कार करण्यात आले. 

बॅलन्स शीट बघण्यासाठी येथे क्लिक करा - जमा खर्च अहवाल


देणगीदार बघण्यासाठी येथे क्लिक करा - सन्माननीय देणगीदार

     -जयदिप गवाळे-





बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

अरबाज पटेल व त्याची जिहादी मानसिकता. BIG BOSS MARATHI

छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याची लाज वाटणारा जिहादी मानसिकतेचा अरबाज पटेल.

काल बिगबॉस मधील एक एपिसोड भाऊचा धक्का जो रविवार ४ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. हा एपिसोड सहज पाहण्यात आला. या वेळी स्पर्धक ह.भ.प.पुषोत्तमदादा पाटील यांच्या निरोपाचा तो क्षण होता व ते सर्वांचा निरोप घेत असतांना.



 ह.भ.प पुषोत्तमदादा पाटील हे वारकरी संप्रदयातील असल्याने सर्वांच्या कल्याणा करिता "पुंडलिका वरदे हरि विठ्ठ्ल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय" चा नामःघोष ते करीत होते सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा होते ही घोषणा होत असतांना प्रत्येक स्पर्धक हात जोडून उभा राहिलेला दिसतो व प्रत्येक स्पर्धक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय ची घोषणा करतांना दिसतो. परंतु हे सर्व होत असतांना जिहादी मानसिकतेचा 'अरबाज पटेल' हाताची घडी घालून शांत उभा असल्याचे विडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.


मराठी माणसाच्या मराठी कार्यक्रमात येऊन मराठी मुलींशी जवळकीने वागण्यात कोणतीही लाज लज्जा शरम न वाटाणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या 'अरबाज पटेल' याला शिवाजी महाराज की जय बोलण्याची लाज वाटावी आणि ते ही महाराष्ट्रात राहून आणि मराठी कार्यक्रमात येऊन हे विशेष आहे. 'अरबाज पटेल' च्या या वागण्याचा निषेध करू तितका कमी आहे. ५७ मुस्लिम देश सोडून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना हिंदुस्थान कडे राजाश्रय मागावा लागतो कारण हा देश शिवाजी महाराज आणि त्यांच्या आदर्शावर चालतो आहे. हे 'अरबाज पटेल' सारख्या जिहाद्यांना कधी कळणार. जगातल्या कोणत्याही मुस्लिम राष्ट्रा पेक्षा तुमच्या आया बहिणी या आमच्या शिवरायांच्या हिंदुस्थानात सुरक्षित आहेत. सुबेदाराच्या सुनेला आईचा दर्जा देणाऱ्या, शत्रू पक्षातील लेकी सुनाना मायेने सुरक्षित ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा नामःघोष करतांना 'जिहादी अरबाज पटेल' याला लाज वाटत असेल तर अशा मानसिकतेत असलेल्या लोकांच्या दिसण्यावर हिंदू मुली आणखीन किती दिवस भाळून 'तुकडे तुकडे' होऊन मरणार आहेत याचा विचार आता मुस्लिमेंतर मुलींना करणे आवश्यक आहे. जिहादी मानसिकतेच्या अशा लोकांची हिंदुस्थाना राहण्याची लायकी तरी काय. ज्या महाराष्ट्राचे मीठ तुम्ही खात आहात त्या मिठाशी तुम्ही नमक हरामी केली आहे. जे कडवे असतील हिंदू असतील आणि मराठी असतील तर त्या प्रत्येकाने या विषयी आपली भूमिका घेतली पाहिजे. हे जिहादी पार्सल कुठून आले आहे तिथे ते पून्हा पाठवले पाहिजे. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांना आणखीन किती दिवस आपण सहन करणार आहोत ? समस्त हिंदूंनी कॅमेऱ्याने टिपलेली हि दृष्य एकदा पहावीत दृश्य पाहिल्यावर महाराष्ट्राच्या पर्यायाने हिंदुस्थानच्या नशिबी अशी माणसे का येतात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडेल . या जिहाद्यानी आज पर्यंत सुंदर लेण्या शिवरायांचे गड-किल्ले व इतर सर्व चांगल्या गोष्टी कदाचित पाहिल्या असतील. मात्र आता त्यांना एकदा कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ मात्र आली आहे.

-जयदिप गवाळे-






शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

वडिलांची गाय गुपचूप विकून पळून गेला होता ह्युंडाई मोटर्सचा संस्थापक

वडिलांकडून चोरलेल्या गाईंची परतफेड म्हणून उत्तर आणि दक्षिण कोरियामधील डीमिलीटराइज्ड झोनमध्ये ५०० गायी घेऊन गेलेल्या चुंग जुयु ग ची गोष्ट 

संधर्भ - The History Of Hyundai



ह्युंडाई मोटर्स कंपनीची स्थापना १९६७ मध्ये चुंग जुयु ग यांनी केली. दक्षिण कोरियातील उलसान येथे ह्युंडाई मोटर्सचा जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्प आहे. या ऑटोमोबाईल उत्पादन प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे १४ लाख युनिट्स इतकी आहे आणि या प्रकल्पामुळे जगभरात सुमारे ७५ हजार लोकांना रोजगार मिळतो.

ह्युंडाई मोटर्सचे संस्थापक चुंग जु युग यांचा जन्म उत्तर कोरियातील टॉंगचॉन या गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात १९१५ साली झाला. चुंग जु युग हा घरातील सर्वात मोठा मुलगा होता आणि त्याचा वडिलांना आशा होती की भविष्यात तो कुटुंबाची शेती आपल्या हाती घेईल.

चुंग जु युग प्राथमिक शाळा पूर्ण करू शकला नाही कारण तो बहुतेक वेळ त्याच्या पालकांच्या शेतात मजुरी करीत असे. चुंग जु युगला मोठं आणि वेगळं काहीतरी करायची इच्छा होती आणि त्यासाठी त्याने आपल्या गावातून आणि गरिबीतून सुटका करण्याचा मार्ग तयार करण्यास सुरुवात केली.वयाच्या सोळाव्या वर्षी चुंग जु युगने टॉंगचॉनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याचा एक मित्रही त्याच्या सोबत होता. काम शोधण्याच्या प्रयत्नात धोकादायक असलेली पीचॉन व्हॅली ओलांडून पंधरा मैलांचे अंतर पार करून अखेर ते कॉवॉन शहरात पोचले. कॉवॉनमध्ये त्यांनी बांधकामाच्या ठिकाणी गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. काही दिवसात चुंग जु युगचे वडील त्याला हुडकत हुडकत कॉवॉन शहरात पोहोचले व त्याला व त्याच्या मित्राला परत घरी घेऊन गेले.पण चुंग जु युगने हार मानली नाही. चुंग जु युगने परत एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी तो थेट दक्षिण कोरीयाच्या सोलमध्ये पोचला. सोलला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून चुंग जु युगने आपल्या घरातील एक गाय विकली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तो ट्रेनने सोलमध्ये पोचला. त्याच्या वडिलांनी दोन महिन्यात त्याला हुडकून काढले आणि चुंग जु युगचा पळून जाण्याचा हा प्रयत्नही फसला.चुंग जु युगाच्या महत्वकांक्षेला मारणे त्याच्या कुटुंबाला वाटले तेवढे ते सोपे नव्हते. वयाच्या अठराव्या वर्षी परत एकदा चुंग जु युग घरातून पळून गेला आणि थेट सोलला येऊन पोचला. सोलमध्ये आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी चुंग जु युगने मिळेल ते काम केले.सोलमध्ये चुंग जु युगला एका तांदळाच्या दुकानात डिलिव्हरी मॅन म्हणून काम मिळाले. नोकरीच्या पहिल्या सहा महिन्यात त्याला बुक कीपर आणि अकाउंटंट म्हणून बढती मिळाली आणि नंतर तो दुकानाचा अविभाज्य भाग बनला. चुंग जु युगने आपल्या कौशल्याच्या जोरावर तांदळाच्या दुकानाला समृद्धीकडे नेले आणि विद्यमान मालकाच्या मृत्यूनंतर तो दुकानाचा मालक बनला.

चुंग जु युगने दुकानाचे नाव बदलून “क्यूनगील राईस शॉप” असे ठेवले आणि त्यामुळे त्याला चांगले उत्पन्न मिळाले. याच दरम्यान कोरिया जपानच्या ताब्यात गेला आणि जपानच्या वसाहतवादी धोरणांमुळे चुंग जु युगचा व्यवसाय अडचणीत आला आणि नंतर तो व्यवसाय संपुष्टात आला.व्यवसाय संपुष्टात आल्याने चुंग जु युग घरी परतला पण त्याला शेती करण्याची काही एक इच्छा नव्हती. यावेळी चुंग जु युगने नवीन योजना आखली आणि तो परत सोलमध्ये येऊन पोचला. काही दिवसांनी त्याने सर्व्हिस गॅरेज उघडण्याचा निर्णय घेतला त्याचा हा उपक्रम यशस्वी झाला आणि या उपक्रमात त्याच्या हाताखाली ७० कर्मचारी कामाला लागले. १९४३ साली जपानी सरकारने त्याचे गॅरेज स्टील प्लांटमध्ये विलीन केले आणि परत एकदा चुंग जु युगला घरी जावे लागले.

१९४६ साली कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले. युद्धानंतरच्या पुनर्बांधणीचा फायदा घेण्यासाठी चुंग जु युग परत सोलला आला आणि ह्युंडाई मोटर्स नावाची कंपनी स्थापन केली.ह्युंडाई मोटर्सने न्यूक्लिअर प्लांटस आणि रेल्वेसह अनेक महत्वाचे करार जिंकले. चुंग जु युगच्या भावाच्या इंग्रजी संभाषणाच्या जोरावर ह्युंडाई मोटर्सला अमेरिकन लष्करी करार मिळाले आणि त्यांचा व्यवसाय आणखी मोठा झाला.यानंतर ह्युंडाई मोटर्स दक्षिण कोरियातील सर्वात यशस्वी उद्योग समूहांपैकी एक बनली. आयोनिक, किया मोटर्स आणि जेनेसीस मोटर्स या ह्युंडाई उद्योग समूहाच्या उपकंपन्या आहेत. कोरियन भाषेत “ह्युंडाई” या शब्दाचा अर्थ आधुनिकता असा होतो. “नवीन विचार नव्या शक्यता” हे सध्या ह्युंडाई मोटर्सचे घोषवाक्य आहे. ह्युंडाई मोटर्सच्या लोगोमध्ये “H” हे अक्षर कंपनीचे नाव दर्शवते तर H भोवती असलेला अंडाकृती ही कंपनीचा जागतिक विस्तार दर्शवते. सुमारे ५००० डीलरशिप आणि शोरूम्सद्वारे १९३ देशात ह्युंडाई मोटर्सच्या गाड्या विकल्या जातात.

११९८ साली चुंग जु युगने सोलला पळून जाण्यासाठी आपल्या वडिलांकडून चोरलेल्या गाईंची परतफेड म्हणून उत्तर आणि दक्षिण कोरियामधील डीमिलीटराइज्ड झोनमध्ये ५०० गायी ते स्वतः घेऊन गेले. या गाई देताना चुंग जु युग यांनी ही आशा व्यक्त केली की या गायी उत्तर कोरियातील गरीब लोकांना मिळतील आणि या गायी कोरिया द्वीपकल्पाच्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून लोक लक्षात ठेवतील.




-जयदिप गवाळे-

गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४

समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी एससी-एसटी आरक्षणात कोट्यामध्ये कोटा. सुप्रीमकोर्टचा महत्वपूर्ण निकाल.

सुप्रीमकोर्टाने एससी आणि एसटी लोकांना समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी एससी-एसटी आरक्षणात कोट्यामध्ये कोटा बनवण्याची परवानगी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दलित आरक्षणाच्या वाटपाचा निर्णय राज्य सरकारे घेऊ शकतील, तर राजस्थान आणि छत्तीसगडमधील आदिवासी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाची वर्गीकरणानुसार विभागणी करता येईल. . यासोबतच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या विभाजनाचा मार्गही खुला केला आहे.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने गुरुवारी राज्य सरकारांना एससी आणि एसटी लोकांना समान प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी एससी-एसटी आरक्षण कोट्यामध्ये कोटा बनवण्याची परवानगी दिली. आता देशातील राज्य सरकारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उप-श्रेणी तयार करू शकतात. मात्र, सर्व श्रेणींचा आधार योग्य असावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह उप-श्रेणी आणि ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा मुद्दा देशातील विविध राज्यांमध्ये दीर्घकाळापासून चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी, न्यायमूर्ती पंकज मिथल, न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला एससी-एसटी आरक्षणाची विभागणी करण्याचा अधिकार दिला आहे.आता घटनात्मक निर्णय राज्याच्या बाजूने आला आहे. यानंतर दलित आणि आदिवासी समाजाला दिलेले आरक्षण आपापल्या राज्यात वाटण्याचा अधिकार राज्य सरकारांना मिळाला आहे. यासोबतच चार न्यायाधीशांनी एससी-एसटीमधील क्रिमी लेयरबाबतही भाष्य केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची योग्य पद्धतीने अमल बजावणी झाल्यास गरिबी रेषेत आणि उपेक्षित असलेल्या मागास समाजाला या आरक्षणाचा नक्कीच फायदा होणार आहे. झोपडपट्टी,गावखेड्यात राहणाऱ्या मागास समाजाचे आरक्षण नेहमीच श्रीमंत मागास समाजाने लाटले आहे. समाजात मनाचे स्थान प्राप्त केल्या नंतर देखील आरक्षण सोडण्याची भूमिका न घेणाऱ्याना सुप्रीमकोर्टाने चपराक लगावण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवार, २९ जुलै, २०२४

सेक्युलर आता शांत का ?

अमित साळुंखे हा गोंधळी समाजाचा आहे. तर विद्या किर्तीशाही ही बौद्ध समाजाची… या दोघांनी आंतरधर्मीय विवाह केला. पण आपल्या समाजात जाती व्यवस्थेची पाळमुळं खोलवर रोवलेली आहेत. याच जातीव्यवस्थेने अमितचा जीव घेतला. आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून विद्याच्या घरच्यांनी अमितची हत्या केली. अमितच्या हत्येने अनेक सवाल निर्माण झालेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्था नाकारली. त्यांच्या विचारांना मानणाऱ्या, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या अनुयायांनी जातीभेदामुळे आपल्याच मुलीच्या पतीची हत्या करावी? आपली जात आपल्याच मुलीच्या सुखाच्या आड यावी? व या सर्व प्रकरणावर सेक्युलर किड्यांनी मुग गिळून शांत राहावे हे विशेष आहे.




सदर प्रकरणात मुलीच्या दलीत बापाकडून व भावाकडून अमितची हत्या केली गेली आहे. परंतु हीच हत्या एखाद्या सवर्णा कडून झाली असती तर एव्हाना महाराष्ट्र पेटला असता किंवा जाणीवपूर्वक पेटवला गेला असता. स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारया बेगडी पत्रकारांनी व नेत्यांनी अनेक मोर्चे व आंदोलने केली असती परंतु आता सर्व शांत आहेत. आंबेडकरी विचार तोंडाने बोलणे वेगळे व प्रतक्ष जगणे वेगळे. संवेदनशीलता या शब्दाचा अर्थ सांगताना एकेठिकाणी बाबासाहेब सांगतात संवेदनशीलता ती नाही जी जातीनिहाय किंवा विचार निहाय येते एखाद्या चुकीच्या घटनेचा बळी तुमचा शत्रू जरी झाला तरी त्या बद्दलची संवेदना जागरूक होणे हीच खरी संवेदनशीलता. उदा. एखाद्या माणसावर अन्याय झाल्या नंतर ती व्यक्ती आपल्या विचार धारेची आहे किंवा आपल्या जातीची आहे हे कळल्यानंतर जर तुम्हाला दुख होत असेल तर ती संवेदनशीलता बेगडी आहे खोटी आहे. 

     अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जगाचा, जाती-पातीचा विचार न करता दोघं प्रेमविवाह करतात. पण सुखी संसाराला सुरुवात होताच त्यांची सुखी संसराची स्वप्न धुळीस मिळवली जातात. कारण मुलीच्या घरचे तिच्या पतीची हत्या करतात.भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित नामक तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघे एकत्र वाढले. पुढे या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. म्हणून पुण्यात येत या दोघांनी लग्न केलं. रजिस्टर मॅरेज केलं. मुलीच्या घरच्यांना वाईट वाटू नये म्हणून पुन्हा अमित व विद्याने बौद्ध पद्धतीने पुन्हा लग्न केलं. लग्नाला एक महिना होतो न होतो तोच अमित साळुंखेची हत्या केली गेली.

संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी त्याला घराबाहेर बोलावून घेतलं. अमित हातात मोबाईल घेत घराबाहेर गेला. घराजवळच्या झालाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रक्ताने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडे पोटाच्या बाहेर आले. अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिलं तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. १४ जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केली आहे.

घटना विरोधी बाजूने घडली असतीतर एव्हाना संसदेत देखील याचे पडसाद उमटले असते परंतु जातीवादाची एकतर्फी पट्टी बांधलेले सेक्युलर आता शांत का ? हीच खरी शोकांतिका. 





   -जयदिप गवाळे-



आसामच्या मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांचा रडीचा डाव आणि कट्टरता वाद

आसामच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्ये ही कारभारातील त्रुटींवरून लक्ष विचलित करण्यासाठी आगामी काही महिन्यांत आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार आ...